Pimpri News : कोरोना प्रतिबंधक लसीचे 4 हजार 810 डोस वाया गेले

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेने लसीचे 4 हजार 810 डोस नासवले आहेत. ‘कोव्हिशील्ड’चे 3 हजार 100 आणि  ‘कोव्हॅक्सिन’चे 1 हजार 710 डोस वाया गेले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. महापालिकेच्या  आणि खासगी अशा 100 केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. महापालिकेला लसीकरणासाठी आजपर्यंत पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेल्या ‘कोव्हिशील्ड’चे  3 लाख 11 हजार 100 डोसेस मिळाले. तर, भारत बायोटेकने बनविलेल्या ‘कोव्हॅक्सिन’चे केवळ 38 हजार 400 डोस मिळाले आहेत. असे एकूण 3 लाख 49 हजार 500 डोसेस प्राप्त झालेले आहेत. महापालिकेला  ‘कोव्हिशील्ड’चे जास्त डोस मिळाले आहेत.

‘कोव्हिशील्ड’चे 3 लाख 10 हजार 890 (99.93 टक्के प्रमाण) तर  ‘कोव्हॅक्सिन’चे 32 हजार 610 (84.92 टक्के प्रमाण)  डोसेसचे लसीकरण केंद्रांवर वाटप करण्यात आले. तर, ‘कोव्हिशील्ड’चे 3 हजार 100 आणि  ‘कोव्हॅक्सिन’चे 1 हजार 710 असे 4 हजार 810 डोस वाया गेले आहेत. महापालिकेकडे सध्या ‘कोव्हिशील्ड’चे 9 हजार 32 आणि ‘कोव्हॅक्सिन’चे 15 हजार 140 असे 24 हजार 172 लसीचे डोस शिल्लक आहेत.

महापालिका प्रवक्ते शिरीष पोरेडी म्हणाले, लसीकरण करताना ‘कोव्हिशील्ड’चे 3 हजार 100 आणि  ‘कोव्हॅक्सिन’चे 1 हजार 710 असे 4 हजार 810 डोस वाया गेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.