Chakan News : खेड मध्ये नवे 49 रुग्ण ; 3 मृत्यू

दिवसभरात 48 डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात बुधवारी  (दि. 18) 22 गावे आणि 3 पालिकांमध्ये 49 रुग्ण मिळून आले आहेत. तर 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कमान येथील 65 वर्षीय महिलेचा, पाईट येथील 70 वर्षीय महिलेचा आणि कोयाळी येथील 35 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सदर चे मृत्यू मागील काही दिवसातील असून बुधवारच्या दैनंदिन अहवालात ते नमूद करण्यात आले आहे.

खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 34 हजार 14 झाला आहे. यापैकी 33 हजार 299 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. दिवसभरात 48 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 227 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी 3 मृत्यूने 488 एवढा झाला आहे. सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 36 रुग्ण, चाकण 4, आळंदी 1, राजगुरुनगर 7 असे एकुण 49 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-

बहुळ, चऱ्होली खु. ,धानोरे,  घोटवडी ,खालुंब्रे , खराबवाडी,  मेदनकरवाडी , महाळुंगे ,पाईट ,पराळे, शेलगाव , सिद्धेगव्हाण, वराळे या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला आहे. बहिरवाडी ,चिंबळी , रेटवडी , काळूस, कुरुळी या गावांमध्ये प्रत्येकी 2 रुग्ण मिळाले आहेत. नाणेकरवाडी , दौंडकरवाडी ,शेलपिंपळगाव  मध्ये प्रत्येकी 3 रुग्ण आणि मरकळ मध्ये 4 रुग्ण मिळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.