Chinchwad : सिमेंट पाठवण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची साडेपाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय असलेल्या एका व्यावसायिकाला फोनवरून सिमेंट पोहोच करतो असे सांगून त्याच्याकडून पाच लाख 40 हजार रुपये घेत सिमेंट पाठवून न देता फसवणूक केली. ही घटना 12 ते 21 सप्टेंबर या कालावधीत संभाजीनगर, चिंचवड (Chinchwad) येथे घडली.
Chinchwad : जुन्या पुणे मुंबई महामार्गावर एसटी बस डिव्हाइडरवर आदळली; प्रवासी सुखरूप
रामदास मानसिंग माने (वय 63, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 022453016, 9850092990 या क्रमांकावरून बोलणारा अभिषेक आणि 794876983 या क्रमांकावरून बोलणारा बिक्रम (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी माने यांच्याशी फोनवरून संपर्क केला. आम्ही तुम्हाला अल्ट्राटेक सिमेंट पाठवतो, असे सांगून माने यांचा विश्वास संपादन केला. माने यांच्याकडून 200 सिमेंटच्या गोण्याची ऑर्डर घेऊन त्याचे पाच लाख 40 हजार रुपये आरोपींनी पाठवण्यास सांगितले. त्यानुसार माने यांनी आरोपींना पैसे पाठवून दिले. मात्र आरोपींनी ठरल्या प्रमाणे सिमेंट पाठवून न देता माने यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.