Lumpy Virus : शहरात 5 जनावरे लम्पी विषाणू बाधित; लसीकरण युद्धपातळीवर करणार

एमपीसी न्यूज – लम्पी विषाणू (Lumpy Virus) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने शहरातील सर्व गाय वंशीय प्राण्यांचे लसीकरण युद्धपातळीवर करण्यात येणार आहे. या विषाणूबाबत पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. तसेच लम्पी विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागाच्या तुलनेत पिंपरी- चिंचवड शहरात कमी आहे. शहरात गायवंशीय प्राण्यांची संख्या 3 हजार 500 असून आतापर्यंत 5 लम्पी विषाणू बाधित जनावरे आढळले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

लम्पी विषाणू साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी लम्पी विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पशुवैद्यकीय विभागाचे उप आयुक्त सचिन ढोले, आरोग्य विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे उप आयुक्त रविकिरण घोडके, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण दगडे यांच्यासह पशुवैद्यकीय विभागाचे डॉक्टर्स, कर्मचारी उपस्थित होते.

लम्पी विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागाच्या (Lumpy Virus) तुलनेत पिंपरी.चिंचवड शहरात कमी आहे, शहरात गायवंशीय प्राण्यांची संख्या 3 हजार 500 असून आतापर्यंत 5 लम्पी विषाणू बाधित जनावरे आढळले आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील गोशाळा, पांजरपोळ, गोठे याठिकाणी पशुवैद्यकीय विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात यावे, तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने आरोग्य विभागामार्फत निर्जंतुकीकरण करण्यासाठी कीटकनाशक फवारणी करण्यात यावी, या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाच्या सहकार्याने युद्धपातळीवर लसीकरण करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करून लसीकरण अधिक गतिमान करण्यात यावे, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी दिले.

Pimpri Water leak Problem : आयुक्तसाहेब 40 टक्के पाणी गळतीकडे लक्ष द्या; शिवसेनेची मागणी

शहरात ज्या ठिकाणी लम्पी विषाणू बाधित जनावरे आढळले आहेत. तेथील 5 किलो मीटर परिसरात लसीकरण प्राधान्याने व जलदगतीने करण्यात येत आहे. मानवाला लम्पी या विषाणूपासून धोका नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच शेळ्या, मेंढ्या इतर पाळीव प्राण्यांनाही या विषाणूपासून धोका नाही. गोठे, गोशाळा याठिकाणी स्वच्छतेबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी, तसेच लम्पी विषाणूबाबत चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाचे उप आयुक्त सचिन ढोले यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.