5 benefits of Vitamin C : विटॅमिन सीचे जाणून घ्या फायदे  

Vitamin C is a vital nutrient for health, Learn the benefits of vitamin C हे पाण्यात विरघळणारे आहे आणि संत्री, स्ट्रॉबेरी, किवी फळ, ढोबळी मिरची, ब्रोकोली आणि पालक यासह बरीच फळे आणि भाज्यांमध्ये ते आढळते.

एमपीसी न्यूज – विटॅमिन सी एक आवश्यक जीवनसत्व आहे, म्हणजे आपले शरीर ते तयार करू शकत नाही. तरीही, त्याच्या बर्‍याच भूमिका आहेत आणि प्रभावी आरोग्य फायद्यांशी जोडले गेले आहे. हे पाण्यात विरघळणारे आहे आणि संत्री, स्ट्रॉबेरी, किवी फळ, ढोबळी मिरची, ब्रोकोली आणि पालक यासह बरीच फळे आणि भाज्यांमध्ये ते आढळते.

विटॅमिन सीचे  5 फायदे

1)तीव्र रोगाचा धोका कमी करू शकतो

विटॅमिन सी एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे जो आपल्या शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकार क्षमता मजबूत करू शकतो. अँटीऑक्सिडेंट्स रेणू रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

जास्त विटॅमिन सी घेतल्यास आपल्या रक्तातील अँटीऑक्सिडेंटची पातळी 30% पर्यंत वाढू शकते. जळजळीचा त्रास कमी करण्यासाठी शरीराच्या नैसर्गिक संरक्षणास मदत करते.

२) उच्च रक्तदाब मॅनेज करण्यास मदत करते

अमेरिकेतील एक तृतीयांश लोकांना उच्च रक्तदाब असतो. जगभरातील सर्वाधिक मृत्यूस कारणीभूत असलेल्या हृदयविकारांना उच्च रक्तदाबामुळे जणू आमंत्रणच मिळते.

अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की विटॅमिन सी उच्च रक्तदाब असलेल्या किंवा नसलेल्या दोन्हीमध्ये रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकेल.

३) रक्तातील यूरिक अ‍ॅसिड पातळीआणि संधिरोगाचा त्रास कमी करू शकते

संधिरोग हा अतिशय वेदनादायक आहे. संधिरोग झालेल्या लोकांना सूज येणे आणि अचानक वेदना होण्याचा त्रास होतो. जेव्हा रक्तामध्ये युरीक अ‍ॅसिड जास्त असतो तेव्हा संधिरोगाची लक्षणे दिसतात. यूरिक अ‍ॅसिड हे शरीराद्वारे तयार केलेले कचरा उत्पादन आहे.

अनेक अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की विटॅमिन सी रक्तातील यूरिक  अ‍ॅसिड   कमी करण्यास मदत करू शकते आणि परिणामी संधिरोगाच्या हल्ल्यापासून बचाव करू शकते.  विटॅमिन सीचे सेवन आणि यूरिक अ‍ॅसिडच्या पातळीत एक मजबूत दुवा असल्याचे दिसून येत आहे.

४) Iron कमतरता रोखण्यास मदत करते

लोह शरीरातील विविध कार्ये करणारा एक महत्त्वपूर्ण पोषक घटक आहे. लाल रक्त पेशी तयार करण्यासाठी आणि शरीरात ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी हे आवश्यक आहे.

विटॅमिन सी आहारातील iron शोषून घेण्यास पूरक ठरतें. मांस न खाणाऱ्या लोकांसाठी हे उपयुक्त आहे, कारण मांस हा लोहाचा प्रमुख स्रोत आहे.

लोह  पातळी कमी असल्यास, विटॅमिन -सीने  समृद्ध असलेल्या आहाराचे सेवन केल्याने रक्तामधील लोहाची पातळी सुधारण्यास मदत होऊ शकते.

५) प्रतिकारशक्ती वाढवते

विटॅमिन सी पूरक आहार घेण्याचे मुख्य कारण म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढवणे. विटॅमिन सीची कमतरता खराब आरोग्याचे लक्षण आहे. उदाहरणार्थ, ज्या लोकांना न्यूमोनिया आहे त्यांच्याकडे  विटॅमिन  सीची पातळी कमी असते,  विटॅमिन सीचे सेवन केल्याने प्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते.

 

विटॅमिन सी समृध्द पदार्थ

  • स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी
  • खरबूज आणि टरबूज
  • टोमॅटो
  • नारळ
  • अननस
  • किवी
  • पेरू
  • आंबा
  • पपई
  • द्राक्षे
  • ब्रोकोली, लाल व हिरवी ढोबळी मिरची आणि फ्लॉवर (फुलकोबी) सारख्या भाज्या.
  • पालक, कोबी सारख्या हिरव्या पालेभाज्या
  • रताळी आणि बटाटे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.