Pune : ‘त्या’ ११ गावांचे प्रतिनिधित्व करायला हवेत 5 नगरसेवक – शिवतारे 

एमपीसी न्यूज – महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांतील प्रलंबित प्रश्नासाठी आज पुणे महापालिकेत राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आढावा बैठक घेतली यावेळी महापालिका आयुक्त महापालिकेतील सर्व खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी नवीन 11 गावांतील प्रश्नांबरोबर या गावांची प्रतिनिधी संख्या कशी असावी यावर चर्चा करण्यात आली. 1 लाख नागरिकांना 1 नगरसेवक असावा असा नियम आहे त्यानुसार या गावांत 2 लाख 36 हजार लोक आहेत त्यामुळे 2 नगरसेवक  या गावचे प्रतिनिधित्व करतील असं दिसतं आहे.

आता 1 सप्टेंबरला जी नवीन मतदार यादी झाली आहे त्यात किती मतदार आहेत ते तपास आताच्या लोकसंख्या वरून नगरसेवक ठरवावेत अस मत विजय शिवतारे यांनी व्यक्त केलं. पुण्यात 15 हजार लोकसंख्येला 1 नगरसेवक आहे मग या गावांला फक्त 2 नगरसेवक देऊन अन्याय होत आहे. त्यामुळे नवीन लोकसंख्या निश्चित करून नवीन समाविष्ठ झालेल्या 11 गावांना 4 ते 5 नगरसेवक असावेत यासाठी मुख्यमंत्र्यांशी देखील बोलणार आहे असं देखील विजय शिवतारे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.