pune : साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांना 5 लाखांची मदत

Literary Uttam Tupe helped 5 lac

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना तातडीने 5 लाख रुपये मदत मंजूर केली आहे. त्यांनी आपल्या लेखणीतून नेहमीच समाजातील वंचित घटकांचे दुःख जगासमोर आणले.

अनेक पुरस्कार प्राप्त झालेल्या या प्रतिभावंत साहित्यिकाच्या हालाखीच्या परिस्थितीची शासनाने दखल घेतली आहे. त्याच आधारे मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना तातडीने 5 लाख रुपये मदत मंजूर केली आहे. गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी मदतीचा धनादेश त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी भेट घेऊन सुपूर्द केला. यावेळी डॉ.पाटील यांनी त्यांची विचारपूस केली. प्रतिभावंत साहित्यिक, कलाकार यांच्या पाठीशी शासन नेहमीच उभे राहील असे आश्वासन यावेळी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.