Coronavirus : पिंपळेसौदागर, दिघी, वाल्हेकरवाडी, पिंपरीतील पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

कोरोना बाधितांचा आकडा पोहचला 245 वर; 142 जण कोरोनामुक्त, कोरोनामुळे 16 जणांचा आजपर्यंत मृत्यू. 5 more patients test positive in Pimpri Chinchwa, the Covid19 patients are from Pimple saudagar, DIghi, Walhekarwadi and Pimpri.

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळेसौदागर, दिघी, वाल्हेकरवाडी आणि पिंपरी परिसरातील पाच जणांचे आज (गुरुवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. याशिवाय मुंबईतील रहिवासी पण महापालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एकाचे अशा सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

शहरातील कोरोना बाधितांचा आकडा 245 वर पोहचला असून 142 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, कोरोनामुळे 16 जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

वैद्यकीय विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने कोरोना संशयितांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे रिपोर्ट सकाळी आले आहेत. त्यामध्ये पिंपळेसौदागर, दिघी, वाल्हेकरवाडी आणि पिंपरी परिसरातील पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामध्ये 25, 32, 35 वर्षीय पुरुष आणि 29, 65 वर्षीय दोन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवा मुंबईतील रहिवासी पण वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 32 वर्षीय पुरुषालाही कोरोनाची बाधा झाली आहे. तर, मोशी, जुनी सांगवी, चिखली येथील चार जण आज कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

महापालिका रुग्णालयात 80 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत शहरातील 245 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 142 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, शहरातील 16 बाधित रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील सात आणि शहराबाहेरील पण महापालिका रुग्णालयात उपचार घेणा-या नऊ अशा 16 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like