Sangli: आणखी पाच कोरोना पॉझिटीव्ह, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 112!

सांगली जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची एकूण संख्या 9

एमपीसी न्यूज – सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील 4 कोरोनाच्या संशयीत रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. याच कुटुंबातील आणखी 5 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सांगली जिल्ह्यात आता कोरोना  रुग्णांची संख्या 4 वरून 9 झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 112 पर्यंत वाढली आहे.

अहवालानंतर संबंधित रुग्ण कोणाच्या संपर्कात होते याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच पुढे घ्यावयाची खबरदारी प्रशासन पूर्णत: घेत आहे. कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.