Maval Corona Update : मावळ तालुक्यात 5 नवे कोरोना बाधित

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी होत आहे. तालुक्यात रविवारी (दि.20) 05 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 09 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रूग्णांची संख्या 45 आहे. 

वडगाव नगरपंचायतीच्या व लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत एकही रूग्ण सापडला नाही. तर तळेगाव नगरपरिषदेच्या हद्दीत 05 रुग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 45 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7829 झाली आहे. तर दिवसभरात 09 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 05 रुग्ण तर ग्रामीण भागात एकही रूग्ण सापडला नाही.

मावळ तालुक्यातील आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. आता पर्यंत 222 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2319, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1564 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 527 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4410 रुग्ण तर ग्रामीण भागात 3419 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.