Moshi : मोशीत प्लास्टिक वापरणा-यांकडून पाच हजार रुपये दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्लास्टिक व थर्माकॉल बाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, मोशी परिसरात आज झालेल्या मोहिमेत पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला व दोन किलो प्लास्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या.
क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी आर.एम.भोसले, आरोग्य निरीक्षक वैभव कांचनगौडार व रवि गायकवाड यांच्या पथकाने देहू – आळंदी रस्त्यावरील मोशी चौक व प्रभागातील विविध दुकानांमध्ये जाऊन प्लास्टिक व थर्माकॉलचा वापर न करण्याबाबत प्रबोधन केले. तसेच काही ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे आढळून आल्याने दोन किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.