Pimpri : रोटरीच्या रक्तदान शिबिरात 50 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज – राेटरी क्लब ऑफ निगडी, राेटरी क्लब चाकण आणि राेटरी क्लब ऑफ चाकण एअरपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पूजा कास्टींग्स प्रा. लि.चे चेअरमन अनिल कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले.

राेटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष विजय काळभाेर, राेटरी क्लब चाकणचे अध्यक्ष सुहास गाेरे, राेटरी क्लब चाकण एअरपोर्टचे अध्यक्ष इक्बाल शेख, राेटरी क्लब निगडीचे माजी अनिल कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.

रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. आपल्या रक्तदानामुळे एखाद्या गरजू रुग्णाचा जीव वाचणार आहे. त्यामुळे रक्तदान करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा संदेश देत रोटरी सदस्यांनी तसेच कंपनीमधील कामगारांनी या शिबिरात सहभाग नोंदवला. एकूण 50 जणांनी कार्यक्रमात रक्तदान केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.