Pimpri : बडवे इंजिनियरिंगतर्फे पूरग्रस्तांना 50 लाखांची मदत 

एमपीसी न्यूज – बडवे इंजिनियरिंग लिमिटेड यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी 50 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. 

बडवे इंजिनियरिंगचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे, संचालिका सुप्रिया बडवे आदी यावेळी उपस्थित होते. या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले.

बडवे ग्रुपच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांसाठी अन्नधान्य, बिस्कीट पुडे, बाटलीबंद पाणी, कपडे, औषधे देखील पाठविण्यात आली आहे. तसेच बडवे इंजिनियरिंगच्या आपत्ती व्यवस्थापनातील काही कर्मचारी देखील यावेळी तेथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती बडवे इंजिनियरिंगच्या संचालिका,  सुप्रिया बडवे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like