Pimpri: कोरोना बाधितांची संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर; एकचदिवशी 50 जणांना लागण

50 more persons tested positive to corona virus ; जुन्नर येथील रुग्णाचा YCMH मध्ये मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधितांची संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

आज एकचदिवशी आनंदनगर,वाल्हेकरवाडी, रुपीनगर, बौद्धनगर, महात्मा फुलेनगर, भीमनगर, च-होली, सांगवी, नेहरूनगर, दापोडी या परिसरातील 39 जणांचे आज (शुकवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

तर, महापालिका हद्दीबाहेरीलही जुन्नर, राजगुरूनगर, देहूरोड, आंबेगाव, पुण्यातील कसबा पेठ, औध, खडकीतील 11 जणांनाही आज कोरोनाची लागण झाली आहे.

त्यांच्यावर पिंपरी महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, जुन्नर  येथील कोरोना बाधित रुग्णाचा महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात आज मृत्यू झाला आहे.

महापालिकेने कोरोना संशयितांचे नमुने तपासाणीसाठी एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे दुपारी रिपोर्ट आले आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील आनंदनगर,वाल्हेकरवाडी, रुपीनगर, बौद्धनगर, महात्मा फुलेनगर, भीमनगर, च-होली, सांगवी, नेहरूनगर, दापोडी परिसरातील 39 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे आहेत.

त्यामध्ये 19 पुरुष आणि  20 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच महापालिका हद्दीबाहेरीलही जुन्नर, राजगुरूनगर, देहूरोड, आंबेगाव, पुण्यातील कसबा पेठ, औध, खडकीतील 11 जणांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यात 10 पुरुष आणि 1 महिलेला बाधा झाली आहे.

जुन्नर येथील रहिवासी असलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबळींची संख्या 20 वर गेली आहे. त्यामध्ये महापालिका हद्दीबाहेरील 12 तर शहरातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

आत्तापर्यंत शहरातील 498 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  266 सक्रिय रुग्णांपैकी महापालिका रुग्णालयात 247 आणि काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरातील 31 रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील तर महापालिका हद्दीबाहेरील 25 रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  आजपर्यंत 224 जण कोरोनामुक्त झाले असून शहरातील आठ तर हद्दीबाहेरील 12 जणांचा अशा एकूण 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

आजचा वैद्यकीय अहवाल!

# दाखल झालेले संशयित रुग्ण – 140
# पॉझिटीव्ह रुग्ण – 50
# निगेटीव्ह रुग्ण – 81
# चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 275
# रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 550
# डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 98
# आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 498
# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 240
# शहरातील कोरोना बाधित 31 रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  20
# आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 224
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 24385
# दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 70425

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.