Chakan News : खेड मध्ये 50 रुग्ण ; 35 डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात रविवारी (दि. 8 ) 22 गावे आणि 3 पालिकांमध्ये 50 रुग्ण मिळून आले आहेत.   खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 33 हजार 684 झाला आहे. यापैकी 32 हजार 996 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे.  

दिवसभरात 35 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 207 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा 481 एवढा झाला आहे.  सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 42 रुग्ण, चाकण 5, आळंदी 2, राजगुरुनगर 1 असे एकुण 50 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-
आव्हाट, बिरदवडी ,धानोरे ,कडूस, करंजविहीरे,  मांजरेवाडी , सावरदरी , शिरोली ,वाशेरे , वासुली ,वेताळे, येलवाडी या गावांमध्ये प्रत्येकी  1 रुग्ण मिळाला आहे.  चिंचोशी ,काळूस ,खराबवाडी ,कुरुळी , वडगाव घेनंद , शेलपिंपळगाव या गावांमध्ये प्रत्येकी 2 रुग्ण , होलेवाडी मध्ये 3, सिद्धेगव्हान मध्ये  4, मरकळ मध्ये 5, आणि चऱ्होली खु. मध्ये  6 असे ग्रामीण भागात रुग्ण मिळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.