Pimpri : रोटरीच्या रक्तदान शिबिरात 50 जणांचा सहभाग

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या रोट्रॅक्ट क्लब ऑफ मॉडर्न महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये 48 जणांनी रक्तदान केले असून 50 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.

यमुनानगर, निगडी येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या प्रांगणात बुधवारी (दि.15) झालेल्या रक्तदान शिबिराला मॉडर्नचे सचिव शरद इनामदार, प्राचार्य सदाशिव शिरगावे, रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष रो. सदाशिव काळे, सचिव रो. महादेव शेंडकर, प्रकल्प अधिकारी रो. गीता जोशी, रो. आनंद सूर्यवंशी, रो. दीनानाथ जोशी, रश्मी भावे, रो. रवींद्र भावे, राम भोसले, वाल्हेकरवाडी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, स्वाती वाल्हेकर, रो बाळकृष्ण उ-हे, मंदाकिनी भोसले, रोट्रॅक्ट क्लबचे मनोज साठे. रोहित वाघमारे, कार्तिकी जाधव, आदित्य रायरीकर उपस्थित होते.

अध्यक्ष सदाशिव काळे म्हणाले, “रक्तदान हे जीवनदान असून सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान केल्याने रक्तदात्याच्या शरीरात नवीन रक्त तयार होते. त्यामुळे दर तीन महिन्यातून एकदा सर्वांनी रक्तदान करायला हवे. यामुळे आरोग्य निरोगी राहते”

रोट्रॅक्ट क्लबचा हा पहिला प्रकल्प आहे. रक्तदान शिबिरात 48 जणांनी रक्तदान केले असून 50 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.