Nigdi : निगडीत 50 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज – बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील 50 हजार रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना यमुनानगर येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

सुभद्रा ज्ञानेश्वर केदारी (वय-61, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचे घर दि. 4 ते 6 डिसेंबर या कालावधीत कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातील 45 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. निगडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.