Navale Bridge Accident: नवले पुलावरील ‘त्या’ दुर्घटनेत 50 ते 60 लाखांचे नुकसान

एमपीसी न्यूज : मुंबई बंगलोर महामार्गावरील नवले पुलावर 20 नोव्हेंबर च्या रात्री एक भीषण अपघात झाला होता. एका भरधाव ट्रकने जवळपास 48 वाहनांना उडवले होते. या अपघातात काहीजण जखमी झाले होते तर मोठ्या प्रमाणात वाहनांचेही नुकसान झाले होते. या संपूर्ण प्रकरणात आता 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाले असावे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

या अपघातादरम्यान ट्रकने धडक दिल्याने अनेक वाहनांचे जबर नुकसान झाले आहे. याचा अंदाज आकडा अंदाजे 50 ते 60 लाख रुपयांच्या घरात असू शकतो, असे आता सांगण्यात येते.

दरम्यान नवले पुलावर झालेल्या या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घेतली होती. या मार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पोलीस आणि महापालिका यांनी एकत्र येत घटनास्थळाची पाहणी केली. या परिसरात असणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचेही आश्वासन यावेळी देण्यात आले होते. दरम्यान या अपघाताचा तांत्रिक विश्लेषण करणारा अहवाल आरटीओने तयार केला आहे.

Thergaon news: थेरगाव सोशल फाऊंडेशनच्यावतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन

सुरुवातीला ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असावा असे सांगण्यात येत होते. मात्र हा धावा आता आरटीओने फेटाळला आहे. आरटीओने पोलिसांकडे सादर केलेल्या अहवालानुसार रस्त्यावर उताराच्या टप्प्यामध्ये मोठी वाहने न्यूट्रल करून चालली जातात आणि त्यामुळे हे अपघात होत असल्याचे या अहवालातून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.