Vadgaon News : मावळमधील 500 कार्यकर्ते करणार केरळचा अभ्यास दौरा

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कृषी, सहकार आणि पर्यटन क्षेत्रातील सुमारे 500 कार्यकर्त्यांना केरळमधील पर्यटन आणि कृषी क्षेत्रातील प्रगतीचा  अभ्यास पाहणीसाठी विशेष अभ्यास दौऱ्याचे आयोजन  केल्याची घोषणा सहकारमहर्षी माऊली दाभाडे यांनी केले आहे. 

वडगाव मावळ येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात मावळ तालुक्यातील सर्व सहकारी  संस्थाचे चेअरमन, सदस्य, सचिव तसेच  सहकार कार्यकर्ते यांच्या विशेष सभेतही घोषणा  करण्यात आली.

यावेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब  गायकवाड,सुभाषराव जाधव, गणपतराव  शेडगे, बबनराव भोंगाडे, पंढरीनाथ ढोरे, बंडुभाऊ सातकर, विलास मालपोटे, बॅंकेचे विभागिय अधिकारी गुलाब खांदवे, राहुल आहेर, हनुमंत रूपावर, कैलास तारु,गणपत भानुसघरे,संजय ढोरे, धर्मा ठोंबरे, सुरेश कालेकर,धनंजय विधाटेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.