Pune : हिरकणी आयोजित पतंग व सांस्कृतिक महोत्सवात महिलांचा उस्फूर्त सहभाग

एमपीसी न्यूज – मकर संक्रांतीनिमित्त हिरकणी कलामंच बहुउद्येशीय संस्था अध्यक्ष, नगरसेविका आरती कोंढरे यांच्या नेतृत्वाखाली 25 व 26 जानेवारीला दोन दिवसीय पतंग व सांस्कृतिक लावणी महोत्सव २०२० चे आयोजन करण्यात आले होते. महिलांमधील कलेला वाव देऊन त्यांना मुक्त व्यासपीठ देण्याचा उद्देश साधता प्रत्यक्ष ३०० महिलांनी वंदेमातरम, लावणी, गवळण, जोगवा यामध्ये आपली कलाकारी सादर केली. तर, ५०० महिलांनी पतंग महोत्सवात उपस्थित दर्शवत १० महिलांनी प्रथम क्रमांकाचा मान पटकवत पैठण्या जिंकल्या.

याप्रसंगी खासदार गिरीश बापट, गिरीजा बापट, स्वरदा बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृहनेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेवक अजय खेडेकर, अभिनेत्री लिला गांधी, डॉ. विठ्ठलराव जाधव डि आयजी (से.वि), विद्या जाधव व आदी उपस्थित होते. तर लकी ड्रॉ चा आनंद लुटत २००० महिलांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

गिरीश बापट म्हणाले, आरती कोंढरे या नेहमीच सामाजिक कार्यक्रम आयोजित करीत असतात. भारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांसाठी विविध उपक्रम राबवितो. नागरिकांच्या सर्वच समस्या सोडविण्यासाठी आम्ही पुढाकार घेत असल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like