Pune : शहरात कोरोनाचे 5 हजार होम कोरनटाईन ; रुग्ण बाहेर पडत असल्याने चिंता

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संशयित तब्बल 5 हजार रुग्ण होम कोरनटाईन करण्यात आले आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. या रुग्णांनी बाहेर पडू नये, यासाठी त्यांना घरपोच किराणा, औषधे, भाजीपाला पोहोच केला जात आहे. तरीही हे रुग्ण बाहेर पडत असल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे.

या रुग्णांनी बाहेर पडू नये, यासाठी त्या भागांत राहणाऱ्या नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे शहरात कोरोनाचे 5 हजार होम कोरनटाईन असून जिल्ह्यात आणखी 5 हजार असे 10 हजार रुग्ण आहेत.

सोमवारी कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुणेकरांनी आता बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी जवळच भाजीपाला, किराणा, मेडिकल उघडे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.