Sangvi : गुंतवणुकीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 51 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – गुंतवणुकीच्या बहाण्याने घेतलेले 51 लाख रुपये परत न देता तीन जणांनी ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली. ही घटना एप्रिल 2028 ते 28 फेब्रुवारी 2020 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली.

दीपक सुर्वे (रा. कांदीवली, मुंबई), संजय रसाळ (रा. बोरिवली, मुंबई) आणि सिद्धार्थ पिलानी (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी श्रावण मोरूमल तलरेजा (वय 61, रा. कुणाल आयकॉन रोड, पिंपळे सौदागर) यांनी शुक्रवारी (दि. 28) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांच्याकडून गुंतवणूकीसाठी दोन टप्प्यात 51 लाख रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी यांनी वेळोवेळी पैशाची मागणी केली. मात्र आरोपींनी पैसे परत दिले नाहीत. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.