Chakan News : खेडमध्ये 51 नवे कोरोना रुग्ण ; 29 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात शुक्रवारी  (दि. 30 ) 23 गावे आणि 3 पालिकांमध्ये 51 रुग्ण मिळून आले आहेत.  खेड तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 33 हजार 403 झाला आहे. यापैकी 32 हजार 655 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे.  दिवसभरात 29 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 268 रुग्ण ॲक्टीव्ह आहेत.

खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा 480 एवढा आहे.  सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 39 रुग्ण, चाकण 2, आळंदी 2, राजगुरुनगर 8 असे एकुण 51 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे- बहुळ, बिरदवडी,  शिवे , सोळू ,वाळद , कडूस , कमान ,कान्हेवाडी तर्फे चाकण , खराबवाडी ,खरपुडी बु. ,कोयाळी,मोई,राक्षेवाडी या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला आहे. संतोषनगर , शिरोली, चऱ्होली खु. , चिंबळी , काळूस, केळगाव , महाळुंगे या गावांमध्ये प्रत्येकी 2 रुग्ण , वाफगाव मध्ये 3, दावडी मध्ये  4, व वासुली मध्ये 5 असे ग्रामीण भागात रुग्ण मिळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.