Chakan News : खेड मध्ये 51 रुग्ण; 37 डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात बुधवारी  (दि. 11 ) 19 गावे आणि 3 पालिकांमध्ये 51 रुग्ण मिळून आले आहेत. खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 33 हजार 787 झाला आहे. यापैकी 33 हजार 69 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे.

बुधवारी दिवसभरात 37 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 235 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा 483 एवढा झाला आहे.  सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 42 रुग्ण, चाकण 4, आळंदी 1, राजगुरुनगर 4 असे एकुण 51 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-
चांदूस, चिंचोशी, गोलेगाव, होलेवाडी, कडूस, खराबवाडी, महाळुंगे, निमगाव, पिंपळगाव, रासे या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला आहे. संतोषनगर,  बहुळ, कोयाळी, मरकळ, मेदनकरवाडी या गावांमध्ये प्रत्येकी 2 रुग्ण मिळाले आहेत. चऱ्होली खु. मध्ये 3, नाणेकरवाडी मध्ये 4, चांडोली मध्ये 5, व शेलपिंपळगाव मध्ये 10 रुग्ण मिळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.