Bhosari : इलेक्ट्रॉनिक व्यवसायाचे आमिष दाखवून दोघांची 52 लाखांची फसवणूक

पैसे मागितल्यानंतर  जिवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – इलेक्ट्रॉनिक व्यवसायाचे आमिष दाखवून दोन मित्रांची दोघांनी तब्बल 52 लाखांची फसवणूक केली. पैसे मागितल्यानंतर दोघांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार नोव्हेंबर 2018 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत भोसरी येथे घडला.

_MPC_DIR_MPU_II

विश्वनाथ बबन टेमगिरे (वय 39, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकनाथ कड, राजू रौधंळ (दोघेही रा. राजगुरूनगर, खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी व त्यांचा मित्र सागर ओमप्रकाश टिळेकर यांना इलेक्ट्रॉनिक व्यवसायाचे आमिष दाखविले. त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी टेमगिरे यांच्याकडून आरोपींनी वेळोवेळी 14 लाख 15 हजार रूपये घेतले. टिळेकर यांच्याकडून 22 लाख 40 हजार रूपये घेऊन 16 लाखांच्या दोन क्रेटा मोटारीही घेतल्या.  दोघांकडून तब्बल 52 लाख 55 हजार रूपये घेतले. फिर्यादी यांना आरोपींना पैसे मागितल्यानंतर त्यांनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like