BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : कंपनीतून 52 हजारांच्या कॉपर केबल चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीमधून 52 हजार 390 रुपये किमतीच्या कॉपर केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. हा प्रकार 7 जुलै रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास प्लाज्मा टेक्नॉलॉजीस भोसरी येथे उघडकीस आला.

बालाजी रघुनाथ चव्हाण (वय 43, रा. दिघी रोड, पुणे) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी येथे प्लाज्मा टेक्नॉलॉजीस ही कंपनी आहे. कंपनीमध्ये कॉपरचे राऊंड, ब्रासचे राऊंड, कॉपरचे राउंड बार आणि कॉपरच्या केबल असा माल ठेवलेला आहे. अज्ञात चोरट्यांनी 6 जुलै रोजी रात्री कंपनीत ठेवलेल्या 52 हजार 390 रुपये किमतीच्या कॉपरच्या केबल चोरून नेल्या. हा प्रकार 7 जुलै रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत बालाजी चव्हाण यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.