Mumbai: राज्यात आज 522 नवीन रुग्णांची नोंद; एकूण रुग्ण संख्या 8590  

एमपीसी न्यूज – राज्यात आज 522 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या 8590 झाली आहे. आज 94 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 1285 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण 6939 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1 लाख 21 हजार 562 नमुन्यांपैकी 1 लाख 12 हजार 52 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर 8590 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 45 हजार 677 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 9 हजार 399 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात 27 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 369 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे 15, अमरावती शहरातील 6, पुणे शहरातील 4 तर जळगाव येथील 1 आणि औरंगाबाद शहरातील 1 आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 15 पुरुष तर 12 महिला आहेत. आज झालेल्या 27 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 13 रुग्ण आहेत तर 8  रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत तर 6 रुग्ण 40 वर्षांखालील आहेत. या 27 रुग्णांपैकी 22 जणांमध्ये (81 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यातील एकाला एचआयव्ही आणि आणखी एक रुग्णाला कर्करोग होता.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 572 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 7861 सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 32.28 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.