Bhosari : ज्येष्ठ महिलेला 53 हजारांना लुटले

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ महिलेचा विश्वास संपादन करून 53 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरट्याने पोबारा केला. ही घटना शुक्रवारी (दि. 30) भोसरी गावातील मंदिराजवळ घडली.

चंद्रभागा दादाभाऊ पिंजन (वय 65, रा. दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रभागा शुक्रवारी भोसरी गावातील मंदिराजवळ थांबल्या होत्या. त्यावेळी एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला. त्याने चंद्रभागा यांचा विश्वास संपादन करून पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख तीन हजार रुपये त्याच्याजवळ काढून घेतले. त्यानंतर आरोपी याने चंद्रभागा यांची नजर चुकवून पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.