पुणे शहरात 55.50 टक्के इतके मतदान

सर्वात कमी विमाननगर-सोमनाथ नगर 45.94 टक्के

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेची निवडणूक शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने आणि पोलीस विभागाने विशेष प्रयत्न केले. पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 55.50 टक्के इतके मतदान झाले आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत काही भागात हाणामारीच्या घटना आणि मतदार यादीतील घोळ होण्याचे प्रकार घडले. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पाहण्यास मिळाली.

या विषयी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी माहिती दिली.विमाननगर सोमनाथ नगर भागात 45.94 टक्के इतके सर्वात कमी मतदान झाले आहे. तर प्रभाग  क्रमांक 15 मधील शनिवार पेठ सदाशिव पेठ यामध्ये सर्वाधिक 62.51 टक्के इतके मतदान करण्यात आले.

या निवडणुकीबाबत महापालिका आयुक्त कुणाल कुमार म्हणाले की, पुणे शहराच्या 2007 साली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत 53 टक्के आणि 2012 मध्ये  50.84 टक्के इतके मतदान झाले होते. तर यंदा पुणे महानगरपालिकेच्या 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शहारत 26 लाख 34 हजार 798 मतदार असून त्यापैकी 14 लाख 62 हजार 409 मतदारांनी मतदान केले आहे. या आकडेवारी यंदा  55 टक्के इतके मतदान झालेाहे.  65 ते 70 टक्के इतके मतदान होईल असा अंदाज होता.  बाणेर, बालेवाडी आणि पाषाण या प्रभाग क्रमांक 9 मध्ये 55.9 टक्के मतदान झाल्याचे आकडेवारी वरून माहिती समोर आली आहे. यातून स्मार्ट सिटीच्या भागातील मतदारांनी मतदानाला अधिकधिक बाहेर पडून मतदानाचा हक्क बजाविला आहे.

तसेच यंदाच्या महापालिका निवडणुकीदरम्यान काही ठिकाणी मतदानाच्या स्लिप वेळेमध्ये मतदारापर्यंत पोहचल्या गेल्या नाहीत. यामुळे नागरिकांना त्रासाला देखील सामोरे जावे लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दुपारी चारनंतर काही प्रभाग केंद्रावर गर्दी देखील वाढली. त्यामध्ये हडपसर आणि बोपोडीचा भाग असून त्या मतदार केंद्रावर रात्री 9 वाजेपर्यंत मतदान चालले असल्याची माहिती त्यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.