Pune Crime News : कोंढवा खुर्दमध्ये परदेशी इसमाकडून 55 ग्रॅम कोकेन जप्त

त्याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलम 8(क),21(ब), 22(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

एमपीसीन्यूज : पुणे शहर पोलीस दलातील खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढवा खुर्द येथे सापळा रचून एका परदेशी इसमाला अटक करुन त्याच्या ताब्यातील 3 लाख 30 हजार रुपये किंमतीचे 55 ग्रॅम कोकेन व अन्य साहित्य असा एकूण 3 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

जेम्स हिलरी ॲसी (वय 27, रा. बेलिसिमा अपार्टमेट, सिल्व्हर स्टार हाॅलजवळ, कोंढवा बुद्रुक,पुणे; मुळ रा. मवांझा, टांझानिया, दक्षिण आफ्रिका), असे अटक आरोपीचे नाव आहे.

खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथक आज, शुक्रवारी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पथकातील पोलीस नाईक शिंदे यांना एक इसम कोंढवा खुर्द येथे अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याचे माहिती मिळाली.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार पथकाने मरळनगर, कोंढवा- येवलेवाडी रोड येथे सापळा लावला.

त्यावेळी तेथे आरोपी जेम्स याच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यावरून पथकाने त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ कोकेनचा साथ आढळून आला.

त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याजवळील 3 लाख 30 हजार रुपये किंमतीचे 55 ग्रॅम कोकेन, 2 हजाराचा एक मोबाईल फोन व 30 हजारांची ॲक्टीवा मोपेड असा एकूण 3 लाख 62 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

तसेच त्याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलम 8(क),21(ब), 22(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.