Pimpri Corona Update : शहरात आज 57 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 57 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली.

 

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही.आजपर्यंत शहरातील 4 हजार 628 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.शहरातील 3 लाख 70 हजार 047 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 463 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 456 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

 

तर, 7 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 1,188 नागरिकांचे लसीकरण झाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.