Vaccine Update : covishield च्या पहिला डोस नंतर 57टक्के तर दुसरा डोस घेतल्यानंतरही 16 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी नाहीत

एमपीसी न्यूज : covishield लसीवर करण्यात आलेल्या एका संशोधनात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ५८. १ टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरियंटविरोधात अँटीबॉडी तयार झाल्या नाहीत. तर या लसीचा दुसरा डोस घेतलेल्या १६.१ टक्के लोकांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या नाहीत असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) च्या एका संशोधनातून उघड झाले आहे.

वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ.टी.जेकब यांनी सांगितले की, अँटीबॉडी न दिसणे किंवा तयार होणे एकचं गोष्ट नाही. यात तटस्थ अँटीबॉडीचे प्रमाण कमी असण्याची शक्यता असू शकते, त्यामुळे ही गोष्ट लक्षात येत नाही. पण अशी अँटीबॉडी शरीरात असू शकतात ज्यामुळे गंभीर लक्षणांपासून संरक्षण होऊ शकते.

गंभीर आजारांचा सामन करणाऱ्या नागरिकांना ‘बुस्टर डोस’ची गरज

न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी ट्रायट्रेस विशेष करुन कोरोनाचे मुळ रुप सार्स-सीओव्ही-२ विषाणूविरोधात लढतात, यामुळे विषाणूला शरीरात जाण्यापासून रोखले जाते. न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीच्या ट्रायट्रेस या बी-1 व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटमध्ये कमी आहेत. या बी-1 व्हेरिएंटमुळेच भारतात कोरोनाची पहिली लाट आली होती.

या व्हेरिएंटच्या तुलनेत न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी ट्रायट्रेस या लसीची पहिला डोस घेणार्‍यांमध्ये ७८ टक्के कमी तर दुसरी मात्रा घेणार्‍यांमध्ये ६९ टक्के कमी होत्या. या व्यतिरिक्त संकमित झालेल्या आणि लसीची मात्रा न घेतलेल्या लोकांमध्ये न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी ट्रायट्रेस ६६ टक्के कमी असल्याचे आढळले.

तसेच ज्या लोकांना कोरोनाची लागण झालेली होती आणि ज्यांनी लसीच्या दोन्ही डोस घेतले होता अशांच्या शरीरात न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी ट्रायट्रेस या ३८ टक्क्यांनी कमी होत्या. त्यामुळे ६५ वर्षावरील रुग्ण जे कॅन्सर, मधुमेह, ब्लडप्रेशर, हॉर्टअटॅक, जुने गंभीर आजारांशी सामना करत आहेत. त्यांनी लसीचा तिसरा डोस दिला जावा असे मतही जेकब यांनी व्यक्त केले.

यामुळे भारतात काही लोकांना कोव्हिशील्डच्या अतिरिक्त बूस्टर डोसची गरज लागू शकते, असे आयसीएमआरच्या या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. तसेच ज्या लोकांना या आधी कोरोनाची लागण झाली आहे त्यांना केवळ एकच मात्रा घेतली तरी पुरेसे आहे. असेही आसीएमआरच्या संशोधनात आढळून आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.