Chakan News : खेड मध्ये 58 रुग्ण ; 23 डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात शुक्रवारी  (दि. 13 ) 32 गावे आणि 3 पालिकांमध्ये 58 रुग्ण मिळून आले आहेत.  खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 33 हजार 874 झाला आहे. यापैकी 33 हजार 120 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे.

शुक्रवारी दिवसभरात 23 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 271 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा 483 एवढा झाला आहे. सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 45 रुग्ण, चाकण 6, आळंदी 3, राजगुरुनगर 4 असे एकुण 58 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-
आंबेठाण, चऱ्होली खु. , चास, चिंबळी, दरकवाडी ,दावडी, धानोरे , गारगोटवाडी , गुंडाळवाडी , होलेवाडी , जैदवाडी ,जरेवाडी , जऊळके खु. , केळगाव, खालुंब्रे , खरपुडी बु. , कोरेगाव बु. , कोये, कुरुळी, मरकळ, मेदनकरवाडी ,पिंपळगाव, सायगाव , शेलपिंपळगाव , सोळू , वडगाव पाटोळे, वाकी खु. , वराळे, वासुली, येलवाडी या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला आहे. भोसे मध्ये 2 रुग्ण आणि  बहुळ मध्ये 3 रुग्ण असे ग्रामीण भागात रुग्ण मिळून आले आहेत. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.