5G In Pune : पुण्यात 5 जी चाचणीसाठी स्पेक्ट्रम वाटप, आयडीया-व्होडाफोन आणि जीओ’ला परवाना

एमपीसी न्यूज – पुण्यात लवकरच 5 जी नेटवर्क सुरू होण्याची शक्यता आहे. कारण, दूरसंचार विभाग ने 5G नेटवर्क चाचणी आणि वापरासाठी mmWave बँडमध्ये 26 GHz आणि 3.5 GHz स्पेक्ट्रमचे वाटप केले आहे. यासाठी आयडीया-व्होडाफोन आणि रिलायन्स जीओ’ला परवाना वाटप करण्यात आला आहे.

आयडीया-व्होडाफोन पुणे शहरासाठी आणि चाकण ग्रामीणसाठी एरिक्सन सोबत तंत्रज्ञान भागीदार आहे. तर, रिलायन्स जीओ पुणे शहरासाठी नोकिया सोबत तंत्रज्ञान भागीदार आहे.

महाराष्ट्र, परवाना सेवा क्षेत्र (दूरसंचार विभाग, DoT), 5G साठी दूरसंचार विभागामधील, ITS महाराष्ट्र परवाना सेवा क्षेत्र, दूरसंचार विभाग प्रमुख विश्वनाथ केंदुरकर, संचालक जयकुमार एन. थोरात, संचालक विनय जांभळी आणि सहाय्यक विभागीय अभियंता बदावथ नरेश यांच्या सुकाणू समितीने शनिवारी (दि.25) पुण्यातील रामी ग्रँड हॉटेल येथील प्रात्यक्षिक स्थळाला भेट दिली. प्रात्यक्षिका दरम्यान, आयडीया-व्होडाफोनने 3.5 GHz वर 1.2 Gbps पेक्षा जास्त, 26 GHz वर सुमारे 4.2 Gbps पेक्षा जास्त वेग गाठल्याचे या समितीला आढळून आले.

प्रात्यक्षिका दरम्यान सुकाणू समितीने वेगवेगळी निरीक्षणे नोंदववली आहेत, त्यानुसार 5G मुळे नेटवर्क आणखी स्ट्रॉँग होऊन अनेक सुविधा आणि सेवा वापरणे सोईस्कर होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.