मंगळवार, डिसेंबर 6, 2022

5G Internet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये 5G इंटरनेट सेवेचं लोकार्पण

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये 5G इंटरनेट (5G Internet) सेवेचं लोकार्पण पार पडलं. यावेळी दूरसंचार क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.

भारतात अखेर आजपासून 5G इंटरनेट नेटवर्क (5G Internet) सुरूवात सुरुवात झाली. या बरोबरच भारताने दूरसंचार क्षेत्रामध्ये एक पुढचे पाऊल टाकले आहे. यामुळे भारतीयांच्या जीवनात मोठा बदल होण्यास मदत होऊ शकते.

भारतात सुरु असलेल्या डिजिटल इंडिया चळवळीलाही या 5G इंटरनेट सेवेमुळे (5G Internet) फायदा होणार आहे.  काही महिन्यापूर्वी केंद्र सरकारकडून 5G स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला. त्यानंतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये 5G नेटवर्कसाठी चढाओढ पाहायला मिळाली होती. आज अखेर देशात 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये इंडिया मोबाईल काँग्रेस (IMC) कार्यक्रमात 5G इंटरनेट (5G Internet) सेवेला सुरुवात झाली.  1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान IMC कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G चे फायदे आणि 5G सेवेचा देशामध्ये तंत्रज्ञानातील क्रांतीला कशी मदत होईल, याबद्दल माहिती दिली. परवडणारं तंत्रज्ञान आणि व्यापक नेटवर्कची गरज यासह डिजिटल इंडिया चळवळीला 5G नेटवर्कचा मोठा फायदा होणार आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, 2014 मध्ये भारतात 25 कोटी इंटरनेट युजर्स होते, आज ही संख्या 85 कोटी झाली आहे. ग्रामीण भागातून इंटरनेट युजर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नवीन आणि जुन्या युजर्सना इंटरनेटच्या 5G सेवेचा मोठा फायदा होईल.

5G चा म्हणजे Fifth Generation असा आहे. ही एक नवीन जागतिक वायरलेस प्रणाली आहे. 5G चा इंटरनेट (5G Internet) स्पीड 4G पेक्षा दहा पटीने जास्त असेल.

सध्या देशातील प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, 2023 पर्यंत देशातील बहुतांश शहरांमध्ये ही सेवा सुरु होईल असे पंतप्रधानांनी सांगितले आहे.

Moshi Hospital : 850 खाटांचे रुग्णालय उभारण्याचा मार्ग मोकळा; आरक्षण हस्तांतरणास जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची मंजुरी

5G इंटरनेट सेवा सुरुवातीला देशातील 13 शहरांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत या 13 शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु होईल. त्यानंतर हळूहळू 5G इंटरनेट सेवेचं जाळं देशभर पसरेल. पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे आणि दिल्लीसह चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर या 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रिजचे (Reliance Industries Limited)  मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी रिलायन्स जिओच्या 5G (Reliance Jio 5G Service) इंटरनेट सेवेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स जिओ डिसेंबर 2023 पर्यंत ग्रामीण भागासह संपूर्ण देशात 5G सेवा पोहोचवेल, असं मुकेश अंबानी यांनी सांगितलं आहे.

देशात 5G सेवा सुरू झाल्यामुळे देशात डिजिटल क्रांती होणार आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया चळवळीला चालना मिळेल.

प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते पार पडलेल्या 5G इंटरनेट लाँच सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी पनवेल महानगर पालिका विद्यार्थांशी संवाद साधला. पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांशीही नी संवाद साधला.

तज्ज्ञांच्या मते, 5G तंत्रज्ञानाचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. आगामी काळात 5G नेटवर्कमुळे भारतातील टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे. भारतीय टेलिकॉम क्षेत्राला जागतिक पातळीवर जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.

Latest news
Related news