Pune : शहरात 6 भाजप, 2 राष्ट्रवादी

कॅन्टोन्मेंट मतदारसंघांत सुनील कांबळे 2 हजार मतांनी पुढे

एमपीसी न्यूज – 2014 च्या मोदी लाटेत भाजपला पुणे शहरातील आठही जागांवर एक हाती विजय मिळाला होता. यावेळी मात्र 5 मतदारसंघांत भाजपला विजय मिळाला आहे. तर, 2 मतदारसंघांत राष्ट्रवादीला विजय मिळाला आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुनील कांबळे 15 व्या फेरी अखेर 2 हजार मतांनी पुढे आहेत. तर, खडकवासला मतदारसंघात नगरसेवक सचिन दोडके यांनी विद्यमान आमदार भिमराव तापकीर यांना चांगलाच घाम फोडला. केवळ 2100 मतांनी तापकीर यांनी विजय मिळविला.

कसबा मतदारसंघात महापौर मुक्ता टिळक यांनी 26 हजार मतांनी, हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी 7 हजार मतांनी, पर्वती मतदारसंघात भाजपच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी 35 हजार मतांनी, शिवाजीनगर मतदारसंघात भाजपचे सिद्धार्थ शिरोळे यांनी 5 हजार मतांनी, वडगावशेरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील टिंगरे यांनी 5 हजार मतांनी, कोथरूडमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जवळपास 25 हजार मतांनी विजय मिळविला.

यावेळी प्रथमच राष्ट्रवादीने वडगावशेरी आणि हडपसर आपले गड मिळविले. तर, भाजपने हे मतदारसंघ गमावले. वडगावशेरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या भाजप प्रवेशाचा भाजपला फायदा झाला नाही, असे बोलले जात आहे.

_MPC_DIR_MPU_II

सचिन दोडके यांनी लावलेल्या फलेक्सचा मला आनंदच –

प्रत्येकाला आनंद साजरा करण्याचा अधिकार असतो. त्याचप्रमाणे सचिन दोडके यांनी विजयाचे लावलेल्या फ्लेक्सचा आपल्याला आनंदच असल्याचे आमदार भिमराव तापकीर यांनी सांगितले

धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल पुण्यात लागल्याची प्रतिक्रिया पुणे शहर भाजपच्या अध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी ‘एमपीसी’न्यूज शी बोलताना दिली. शहरात 6 जागा मिळाल्याचा आनंद आहे. मात्र, 2 जागा गेल्याचे दुःख असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.