Pimpri : पालिका भूखंडासाठी प्राधिकरणाला देणार सहा कोटी; स्थायीची मान्यता 

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण पेठ क्रमांक 30 मधील प्राथमिक शाळा क्रमांक एकचा भूखंड पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे शैक्षणिक वापरासाठी हस्तांतरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका 6 कोटी 17 लाख 53 हजार 620 रुपये अधिमूल्य प्राधिकरणाकडे भरणार असून त्याला आज (बुधवारी) स्थायी समितीने मान्यता दिली.  

महापालिका शिक्षण समितीने प्राधिकरण हद्दीत चिंचवड येथील पेठ क्रमांक 30 मध्ये प्राथमिक शाळा क्रमांक एकच्या जागेची शैक्षणिक वापरासाठी मागणी केली आहे. हा भूखंड शाळेसाठी आरक्षित असून, त्याचे 5037.00 चौरस मीटर इतके क्षेत्रफळ आहे. शैक्षणिक वापरासाठी हा भूखंड देण्याबाबत भूखंडाचे दर हे निवास दराच्या 50 टक्‍के प्रमाणे आकारण्यात यावेत, असा ठराव करण्यात आला आहे.

त्यानुसार संबंधित भूखंडाच्या अधिमूल्यास सवलतीच्या दराने म्हणजे अधिमूल्याच्या 50 टक्‍के दराने 6 कोटी 17 लाख 53 हजार 620 रुपये इतके अधिमूल्य महापालिका प्रशासनाकडून जमा करण्यात येणार असून त्याला स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.