Pimpri: दिघी, किवळे, चिंचवड, चिखली मधील आणखी सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; दिवसभरात सहाजण कोरोनामुक्त

दिवसभरात 9 नवीन रुग्णांची नोंद. 6-more-persons-test-positive-for-coronavirus-are from Dighi, Vikasnagar, Anand nagar, More vasti Chikhali-total-9-persons-test-positive-to-covid19-in-pimpri-chinchwad-today

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड परिसरातील दिघी, विकासनगर किवळे, आनंदनगर चिंचवड, मोरेवस्ती चिखली परिसरात सहा जणांचे रिपार्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आज दिवसभरात नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दिवसभरात सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने कोरोना संशयितांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट सायंकाळी आले आहेत.

त्यामध्ये दिघी, विकासनगर किवळे, आनंदनगर चिंचवड, मोरेवस्ती चिखली परिसरातील सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये 36, 50 वर्षीय दोन पुरुष आणि 19, 25, 33  आणि 63 वर्षीय अशा चार महिलांना कोरोनाची लागण झाली आहे.

तर, मोशी, च-होली, रुपीनगर, संभाजीनगर येथील रहिवासी असलेले सहा रुग्ण आज कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

महापालिका रुग्णालयात सक्रिय 64 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, पिंपरी-चिंचवड शहरातील 204 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 125 जणांनी आत्तापर्यंत कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

तर, आजपर्यंत पुण्यातील पण महापालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आठ आणि शहरातील चार अशा 12 जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

आजचा वैद्यकीय अहवाल!

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 91
# पॉझिटीव्ह रुग्ण – 9
#निगेटीव्ह रुग्ण – 43

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 127
#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 187
#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 48
#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 204
# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 64
# शहरातील कोरोना बाधित एकरा रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  12
#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 125
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 26895
#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 85121

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.