UPDATE Pimpri: धोका वाढला! एकाच दिवशी सहा कोरोना पॉझिटीव्ह; रुग्णांची संख्या नऊवर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा धोका वाढला आहे. आज (शनिवारी) एकाच दिवशी नवीन सहाजण कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या नऊवर गेली आहे. चार वायसीएमधील आणि दोन जण खासगी रुग्णालयात दाखल होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर मागील तीन दिवसांपासून पुन्हा शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे.

दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी जमात मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांतून आलेल्या दोघांना गुरुवारी आणि त्यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील एकाला शुक्रवारी अशा तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांनतर आज पुन्हा एकाचदिवशी सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यामध्ये दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी जमात मधील धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या  23 नागरिकांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आलेल्या चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल असलेला एक आणि पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल असलेला पण पिंपरी-चिंचवडला कामाला असलेला अशा दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यातील एकजण अमेरिकेतून प्रवास करून आला आहे. आज एकाच दिवशी सहा रुग्ण आढळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या नऊवर गेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.