Corona Update : अतिशय गंभीर! देशातील 60 टक्के कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात

एमपीसी न्यूज : भारतात 2 लाख 53 हजार 746 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 1 लाख 52 हजार 760 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत. देशातील एकूण कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. 

भारतात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. महाराष्ट्रातील कोरोना संकटाचा अंदाज घेऊन राज्याला कोरोना प्रतिबंधक लसचे 54 लाख डोस देण्यात आले. यापैकी जेमतेम 23 लाख डोसचा वापर 12 मार्चपर्यंत झाला. महाराष्ट्र सरकारच्या नोंदींवरुन ही बाब स्पष्ट होते; अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. जावडेकरांनी दिलेल्या आकडेवारीतून राज्याकडे अद्याप 31 लाख डोस शिल्लक असल्याचे उघड झाले आहे.

देशातील 60 टक्के कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात असूनही ठाकरे सरकारने केंद्राकडून मिळालेल्या कोरोना प्रतिबंधक लसच्या 54 लाख डोसपैकी फक्त 23 लाख डोस दोन महिन्यांच्या कालावधीत वापरले आहेत. अद्याप सरकारकडे 31 लाख डोसचा साठा आहे. हा साठा अंतिम टप्प्यात पोहोचण्याआधीच महाराष्ट्र शासनाने दर आठवड्याला 20 लाख डोस पुरवावे अशा स्वरुपाची मागणी केंद्र सरकारला केली आहे.

दोन महिन्यांत 23 लाख डोस वापरणाऱ्या ठाकरे सरकारने दर आठवड्याला 20 लाख डोसची मागणी केली. यानंतर जावडेकरांनी महाराष्ट्रातल्या लसीकरण मोहिमेच्या ताज्या स्थितीचे नेमके चित्र जगजाहीर झाले. तसेच महाराष्ट्रातील प्रशासकीय नियोजनाबाबत नाराजी व्यक्त केली.

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. राज्यात बुधवार 17 मार्च रोजी नव्या 23 हजार 179 कोरोना रुग्णांची नोंद झाली. याआधी मंगळवार 16 मार्च रोजी 17 हजार 864 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर सोमवार 15 मार्च रोजी 15 हजार 51 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.