Moshi : मोशीत 60 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज – दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 60 हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना आदर्शनगर, मोशी येथे शनिवारी (दि. 8) पहाटे उघडकीस आली.

प्रशांत श्रीहरि शितोळे (वय 29, रा. शितोळे निवास, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेबारा ते पहाटे पाच वाजताच्या दरम्यान फिर्यादी शितोळे यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट उचकटून आतील 60 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.