India Corona Update : गेल्या 24 तासांत 61 हजार 871 नवे रुग्ण, एकूण रुग्ण संख्या 75 लाखांच्या उंबरठ्यावर

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत 61 हजार 871 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 75 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. मागील 24 तासांत देशभरात 1 हजार 033 कोरोना रुग्ण दगावले आहेत. 

देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या
74 लाख 94 हजार 552 एवढी झाली आहे. त्यापैकी 65 लाख 97 हजार 210 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या 7 लाख 83 हजार 311. सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत देशभरात 1033 रुग्ण दगावले असून आतापर्यंत जवळपास 1 लाख 14 हजार 031 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.

मागील काही दिवसांपासून देशात दररोज नव्यानं वाढ होणा-या रुग्णापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 72 हजार 614 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्के एवढं झाले आहे तर मृत्यूदर 1.53 टक्यांपर्यंत खाली आला आहे.
देशात आतापर्यंत 9 कोटी 42 लाख 24 हजार 190 इतके नमूणे तपासण्यात आले आहेत. मागील 24 तासांत देशभरात 9 लाख 70 हजार 173 एवढ्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.
देशात सध्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांत सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 1 लाख 85 हजार 750 एवढे सक्रिय रुग्ण आहेत तर कर्नाटकमध्ये 1 लाख 10 हजार 666 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील चाचणी क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढली असून रुग्ण सकारात्मकतेचा दर खाली घसरत असल्याचं केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हंटल आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.