Pimpri Corona Update : शहरातील कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक; एकाच दिवशी 60 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू
62 persons have tested positive for Coronavirus in Pimpri Chinchwad today, highest number of covid19 patients in a day. आज चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आलेले रुग्ण आनंदनगर, अजंठानगर, दापोडी, काळेवाडी, पिंपरीगांव, जुनी सांगवी, पाटीलनगर, चिखली, फुलेनगर, बालाजीनगर, रहाटणी, वाकड, दळवीनगर, पिंपरी स्टेशन, साईबाबानगर चिंचवड, गवळीनगर भोसरी, पवनानगर पुणे व मुंबई येथील रहिवासी आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी (दि. 7) एकाच दिवशी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 60 ने वाढली आहे. यामुळे शहरात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 768 एवढी झाली आहे. तर दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आलेले रुग्ण आनंदनगर, अजंठानगर, दापोडी, काळेवाडी, पिंपरीगांव, जुनी सांगवी, पाटीलनगर, चिखली, फुलेनगर, बालाजीनगर, रहाटणी, वाकड, दळवीनगर, पिंपरी स्टेशन, साईबाबानगर चिंचवड, गवळीनगर भोसरी, पवनानगर पुणे व मुंबई येथील रहिवासी आहेत.
सध्या शहरात कोरोनाचे 288 सक्रिय रुग्ण आहेत. तर 438 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एका रुग्णाला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी 177 संशयित रुग्ण शहरातील रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 270 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. 279 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
विजयनगर दिघी व धनकवडी पुणे येथील रहिवासी असलेल्या कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आज मृत झालेल्या रुग्णांमध्ये आनंदनगर चिंचवड येथील 58 वर्षीय आणि रमाबाईनगर पिंपरी येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे. आजवर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील 14 आणि हद्दीच्या बाहेरील 17 लोकांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका हद्दीबाहेरील दोन पुरुषांना कोरोनाची लागण झाली आहे. हद्दीच्या बाहेरील 47 रुग्ण पिंपरी येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर 59 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही, याची काळजी व दक्षता घ्यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त मास्क जवळ बाळगावा, असे वैद्यकिय विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.