Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणातून 620 क्यूसेक विसर्ग सोडणार

एमपीसी न्यूज – भामा आसखेड धरण जलाशयातील पाणीसाठा 100 टक्के झाल्याने प्रकल्पाच्या चार वक्र दरवाज्यातून 620 क्यूसेक एवढा विसर्ग भामा नदीत सोडण्यात येणार आहे,असे भामा आसखेड धरण पूर नियंत्रण कक्षाने सांगितले आहे.

River conservation: नदीसंवर्धनासाठी ‘नदी सुरक्षा पथकाची’ स्थापना

नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावीत,असे आवाहन भामा आसखेड धरण पूर नियंत्रण कक्षाने नागरिकांना केले आहे. भामा आसखेड धरण हे भामा नदीवर खेड तालुक्यात बांधण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.