India Corona Update : चोवीस तासांत 62 हजार नवे रुग्ण, देशात 8.65 लाख सक्रिय रुग्ण 

एमपीसी न्यूज – भारतातील नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या घटली असून, सलग नवव्या दिवशी पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. मागील चोवीस तासांत देशभरात 62 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची आणखी घटली असून सध्या 8.65 लाख सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 62 हजार 224 नव्या रुग्णांची नोंद झाली. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 96 लाख 33 हजार 105 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 83 लाख 88 हजार 100 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 देशात तासांत 1 लाख 07 हजार 628 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट 95.80 टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे.

देशात सध्या 8 लाख 65 हजार 432 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना मृतांची संख्या 3 लाख 79 हजार 573 एवढी झाली आहे. मागील 24 तासांत 2 हजार 543 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशात आजवर 38 कोटी 33 लाख 06 हजार 971 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 19 लाख 30 हजार 987 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 26 कोटी 19 लाख 72 हजार 014 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 देशात तब्बल 28 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.