Pune : सुनेने रचला सासूच्या हत्येचा कट ; सुनेसह दोघांना अटक

एमपीसी न्यूज- घरात निवांतपणा मिळत नाही म्हणून बहीण आणि मित्राच्या मदतीने सासूच्या हत्येचा कट रचणाऱ्या सुनेस पोलिसांनी गजाआड केले. अपघातात जखमी झाल्याचे सांगून सासूला सुनेने तिच्या मित्राच्या मदतीने ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांना संशय आल्यामुळे त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीसी खाक्या दाखवताच खरा प्रकार उघडकीस आला.

_MPC_DIR_MPU_II

फरजाना शेख असे या सासुचे नाव आहे. सहा महिन्यापूर्वी त्यांच्या मुलाचे लग्न झाले. घरातील कामावरून सुनेबरोबर त्यांचे वाद होत असत. तिच्यामुळे आपल्याला निवांतपणा मिळत नाही, या कारणावरून सुनेने आपली बहिण आणि मित्राच्या मदतीने तिच्या हत्येचा कट रचला.

सोमवारी (30 जुलै) सुनेने सासूला पिण्यासाठी सुप करून दिले. त्यात गुंगीचे औषध मिसळले. सासू बेशुध्द पडताच सुनेची धाकटी बहीण आणि तिच्या मित्राने सासुला कुकरने मारहाण केली तिचा मृत्यू झाल्याचे समजून तिघांनी फरजाना शेख यांना ससून रुग्णालयात दाखल केले आणि तेथील डॉक्टरांना अपघातात जखमी झाल्याचे सांगितले. डॉक्टरांनी तपासणी केली असता फरजाना जिवंत असल्याचे लक्षात आले. डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी ही माहिती पोलिसांनी दिली आणि हा कट उघडकीस आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.