Pune : इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थच्या वतीने 16 ऑगस्टपासून संस्कारमाला

राष्ट्र पुरुषांच्या जीवनगाथांमधून मिळणार मनआरोग्याचे प्रशिक्षण

एमपीसी न्यूज- इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थतर्फे राष्ट्र पुरुषांच्या जीवनगाथांमधून मनआरोग्याचे प्रशिक्षण या संस्कारमाला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 16 ते 19 ऑगस्ट दरम्यान दररोज संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत एरंडवणे येथील शामराव कलमाडी कनिष्ठ महाविद्यालयात ही संस्कारमाला चालणार आहे. यामध्ये मनोविकासतज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी राष्ट्र पुरुषांच्या जीवनगाथांमधून मनआरोग्याचे प्रशिक्षण देणार आहेत.

गुरुवार दि. 16 ऑगस्ट रोजी लोकमान्यांकडून आज नेमके काय शिकावे ? या विषयावर टिळकांचे जीवनचरित्र आणि व्यक्तिमत्वाचा मागोवा घेण्यात येणार आहे.

शुक्रवार दि. 17 ऑगस्ट रोजी आग्र्‍याहून सुटका : कुशल आपत्तीव्यवस्थापनाची कहाणी या विषयावर केवळ बुद्धी, वैचारिक भान, भावनिक नियोजन ह्या बळावर यश प्राप्त कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.

शनिवार दि. 18 ऑगस्ट रोजी वन मॅन आर्मी या विषयावर सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकण्यात येईल.

रविवार दि. 19 ऑगस्ट रोजी दांडी यात्रा : प्रकल्प नियोजन आणि संवादतत्वे या विषयावर दांडी यात्रा मोहीम आणि गांधीजींच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये सांगण्यात येणार आहेत.

प्रत्येक विषयावर डॉ. आनंद नाडकर्णी यांचे अडीच तासाचे सादरीकरण होणार असून पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन्स, दुर्मिळ छायाचित्रे आणि फिल्म क्लिप्स. अस्सल ऐतिहासिक साधनांचा अभ्यास करून, मानसिक आरोग्याचे संदेश देणारे हे प्रभावी सादरीकरण कुटुंबातल्या सर्वांसाठी. इतिहासाकडे पहाण्याची वर्तमानदृष्टी देणारी एक आगळीवेगळी मनसंवादमाला आहे, या संवादमालेचा लाभ जास्तीतजास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थतर्फे करण्यात आले आहे. ह्या कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका खालील ठिकाणी उपलब्ध असतील.

Institute for Psychological Health
Plot No. 4, Yashashree Colony, Near Vendant Nagari,
Cummins College Road, Opp. Chandni Hotel,
Karvenagar, Pune 411052
Phone No.: 020-25474705 / 06, 7588098053, 7588098056

M. C. Datar Classes
Commerce Avenue. 3rd floor,
Above P.N. Gadgil Showroom on Paud Road, Pune 411038
Phone No. 9552551321

Gadre’s Furniture Gallary
1392, Shukrawar Peth,
Nava Vishnu Chowk, Natu baug, Pune 411002
Phone No.. 9766323070

चारही दिवसासाठी एकत्रित देणगी प्रवेशिका रु.1000 /- आणि रु.700/- उपलब्धतेनुसार मिळतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.