Pune : पुरंदरने मला आणि सुप्रियला केंद्रात काम करण्याची संधी दिली – शरद पवार

एमपीसी न्यूज- पुरंदरने केंद्रात आणि राज्यात काम करण्याची संधी मला आणि सुप्रियाला दिली. निवडणुकीच्या काळात मी कधी पुरंदरला गेलो गेलो नाही तरी देखील पुरंदरने मला भरपूर पाठिंबा दिला. त्यामुळे मी पुरंदरवासीयांच्या कोणत्याही कार्यक्रमाला जायचे टाळत नाही असे वक्तव्य माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज पुण्यात केले.

आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर व पुरंदर मित्र मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुरंदर मित्र मंडळ पुणे रौप्य महोत्सवी स्नेहमेळावा आणि जयसाहेब पुरंदरे यांच्या अभीष्टचिंतन सोहळा कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.