Daund : आखाड पार्टीमध्ये तरुणाचा खून

एमपीसी न्यूज- घरी ठेवलेल्या आखाड पार्टीतच तरुणाचा तलवारीने वार करून खून केला. ही घटना दौंड तालुक्यातील देलवाडी एकेरीवाडी येथे रविवारी (दि. 5) रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली.

स्वप्नील ज्ञानदेव शेलार (वय 30) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. शेलार याने घरी आखाड पार्टी ठेवली होती. त्यावेळी अज्ञात मारेकऱ्यांनी त्याला डबा घेऊन बाहेर बोलावून त्याच्यावर तलवारीने वार केले. यामध्ये शेलार याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांना एक पिस्तूल आढळून आले आहे. घटनास्थळावरून मारेकरी फरार झाले आहेत. यवत पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.