राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेला कै. एस.आर.ओझर्डे शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज- मुळशी तालुक्यात वसतिगृह, शेतीचे विविध प्रयोग तसेच नापास विद्यार्थ्यांसाठी हिम्मत शाळा चालवणाऱ्या राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेला ‘कै. एस.आर.ओझर्डे शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ११ हजार रोख आणि चांदीचा चषक असे पुरस्काराचे स्वरूप होते. निगडी येथील स्पर्धा यश अकादमीतर्फे सत्कार समारंभ व पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच पार पडला.

या कार्यक्रमात अकादमीमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि केंद्रशासन,राज्य शासन, विविध महामंडळ यामध्ये निवडल्या गेलेल्या 40 अधिकारी,तसेच प्रशासकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्कृती स्कूलचे डॉ. गिरीजप्रसाद मुंगाली होते, तर भवताल मासिकाचे संपादक अभिजित घोरपडे, तहसीलदार विवेक जाधव, तहसीलदार सीमा होळकर, लेफ्टनंट कंमांडर संकेत कदम, मुख्य गुप्तवार्ता अधिकारी प्रवीण देवकर, आयआयसीएमआर ग्रुपच्या संस्थापिका डॉ. अश्विनी कुलकर्णी, पीसीएनटीडीच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी आशाराणी पाटील, नोव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अमित गोरखे, नगरसेवक अमित गावडे, स्पर्धा यश अकादमीच्या संचालिका प्रा. दीपाली ओझर्डे, संचालक प्रा. आलोक ओझर्डे उपस्थित होते.

सचिन पटवर्धन म्हणले. ” स्पर्धा परीक्षेतील अपयशाने खचून न जाता, त्या ज्ञानाचा उपयोग करून विविध खासगी क्षेत्रात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करताना जीवनात यशस्वी होण्याचा मूलमंत्र सांगितला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा यश अकॅडेमिचे संस्थापक प्रा. भूषण ओझर्डे यांनी केले. सविता नाणेकर, सचिन ढोबळे यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री ओझर्डे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता शिवकुमार श्रीराम वर यांच्या पसायदानाने झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.